वाहनचालकांमध्ये संताप सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
पुणे – विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांमुळे पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील रविवारी खेड-शिवापूर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे अनेक ठिकाणी मुख्य महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक खोळंबलेली होती.
विधानसभा निवडणुकीचे मतदान सोमवारी आहे. दरम्यान, रविवार सुट्टीचा दिवस जोडून आल्याने दोन दिवसांच्या सुट्टीसाठी पुणे, मुंबई शहरांतून सातारा, सांगली, कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात नागरिक निघाले होते. त्यामुळे पुणे शहराजवळील राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यावर मोठ-मोठ्या वाहनांच्या रांगा लागल्याचे दिसून आले. यामुळे मुख्य महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच, टोलनाक्याच्या पुढे खंडाळा घाटात अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लगाला.