लोणंद – माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर ईडीने सुडबूद्धीने कारवाई करीत असल्याचा दावा करत लोणंद राष्ट्रवादी कॉंग्रेसने दिलेल्या लोणंद बंदच्या हाकेला लोणंदकरांनी थंड प्रतिसाद दिला. लोणंद राष्ट्रवादी कॉंग्रेसने केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर सुडबूद्धीने ईडी कारवाई करत असल्याचे सांगत याबाबत सरकारचा निषेध करत त्याबाबतचे पत्र लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि. संतोष चौधरी यांच्याकडे सकाळी अकरा वाजता सुपूर्द केले.
याप्रसंगी नगरसेवक तथा गटनेते योगेश क्षीरसागर, नगरसेवक तथा पक्षप्रतोद हणमंतराव शेळके, नगरसेवक विकास केदारी, स्विकृत नगरसेवक सुभाषराव घाडगे, राष्ट्रवादी विध्यार्थी कॉंग्रेस प्रदेश सचिव गजेंद्र मुसळे, युवा नेते दशरथदादा जाधव,रविंद्र क्षीरसागर, राजाभाऊ खरात, सागर शेळके,डॉ. नितीन सावंत, कय्युम मुल्ला, गौरव फाळके, सूनिल शहा, संतोष खरात, बबलूभाई इनामदार, जावेद पटेल, अक्षय कुरणे, आकाश क्षीरसागर, अजित भोईटे, सचिन पानवकर आदी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.