स्मार्टवर्क करून परीक्षा “ट्रेक’ करा

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हर्षवर्धन पाटील यांचा सल्ला

पुणे – स्पर्धा परीक्षेमध्ये इंदापूर तालुक्‍यातील सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्वांनीच मन लावून अभ्यास केला पाहिजे. त्याचबरोबर मेहनतीने व स्मार्टवर्क करून परीक्षा “ट्रेक’ करता आली पाहिजे, असा सल्ला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील पाटील यांनी केले.

पुणे येथील पत्रकार भवन येत्थे “युवा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीत पाटील बोलत होते. ते म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील तरुणांनी प्रशासकीय सेवेत येण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे, यासाठी पुणे शहरामध्ये एक वेगळा इंदापूर पॅटर्न तयार केला जाईल. माझ्या संस्थेची अर्धा एकर जागा असून, त्या जागेमध्ये हे अद्ययावत वसतिगृह पुढील नजीकच्या काळात बांधण्यात येईल. त्यामध्ये 200 ते 300 विद्यार्थ्यांची राहण्याची अतिशय चांगली सुविधा निर्माण करण्यास मी कटिबद्ध असल्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, मला माहित आहे की शहरांमध्ये आल्यानंतर भोजन, राहणे, अभ्यासिकेचे अनंत प्रश्‍न असतात त्यावर मात करण्यासाठी हे वसतीगृह आम्ही बांधणार आहोत.त्याचबरोबर अद्ययावत अशी ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली जाईल. ज्यांनी घवघवीत यश संपादन करून उच्च पदावर काम करीत आहेत, त्या सर्व अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळवून देण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. दरम्यान, अतिशय खेळीमेळीच्या या कार्यक्रमात त्यांनी अनेक किस्से, संसदीय कामकाज मंत्री असताना किंवा इतर वेगवेगळ्या 18 खात्याचे मंत्री म्हणून काम करीत असताना आलेले अनुभव त्यांनी कथन केले.

या कार्यक्रमाचे आयोजन प्रतिक रेडके, सुरज पाटील, वैभव पागल, समाधान जाधव, अमित शिंदे राहुल जगताप, विशाल जाधव, प्रशांत बागल, सागर काळे, सुरज पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या या प्रश्‍नांना दिलखुलास उत्तरे पाटील यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.