विकासाची टिमकी वाजवण्यातच विरोधक पटाईत

अंकीत जाधव : वळसे पाटील यांच्या प्रचारार्थ साधला मतदारांशी संवाद

मंचर – विरोधक विकासाची फक्‍त टिमकी वाजवतात. त्यांनी विकासाचे गाजर दाखवून जनतेला झुलवत ठेवले आहे. पण जनता दुधखुळी नाही. विकास कोण करतो आणि विकासाचा गाजावाजा कोण करतोय. जनतेला समजते. शिवराळ भाषा वापरुन विकास होत नसतो. याचा बोध विरोधकांनी घ्यावा, त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिलीप वळसे पाटील यांना भरघोस व प्रचंड बहुमताने निवडून देणार आहोत, अशी ग्वाही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते अंकीत जाधव यांनी दिली.

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम यांच्या मार्गदर्शनाखाली नांदूर येथील मतदारांशी जाधव यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सरपंच शेखर चिखले, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश वायाळ, बाळासाहेब जाधव, जयेश नाईकडे, राजेंद्र जाधव, सुदाम भालेराव, बजरंग वायाळ, स्वप्नील जाधव, सिताराम भालेराव, नांदूर येथील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, शैलेश जाधव, सागर वाळुंज, विजय चिखले, केतन चिखले, ज्योती वायाळ, कांताबाई जाधव, संजीवनी जाधव, अर्चना चिखले, माया जाधव, अश्‍विनी भालेराव यांनी संवादात सहभाग घेतला.

अंकीत जाधव म्हणाले की, गेल्या 30 वर्षांत आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे काम दिलीप वळसे-पाटील यांनी केले. नांदुर परिसरातील रस्ते, वीज, पाणी, मंदिरासाठी निधी, समाज मंदिर सभागृह यासारखी महत्त्वाची व गरजेची कामे केल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे-पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देणार आहोतच. तसेच त्यांच्या पाठीशी नांदूर परिसरातील गावे खंबीरपणे उभी राहतील. वळसे पाटील यांनी तालुक्‍याचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत सातव्यांदा ते भरघोस मतांनी निवडून येतील. विरोधकांनी कितीही खालच्या भाषेत जाऊन टीका केली. तरी जनता त्यांना माफ करणार नाही. या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवून देईल यात शंकाच नाही, असे त्यांनी नमूद केले.

वळसे पाटील यांची कामे डोंगराएवढी
शिवसेनेने एखाद्या गावात छोटा बसथांबा उभारायचा व त्याला आपले स्वतःचे नाव द्यायचे.असा विकास सुरू आहे. प्रत्यक्ष काम नाही; मात्र गाजावाजा करायचा हे त्यांचे धोरण आहे. विरोधी पक्षांचे उमेदवार यांचे तालुक्‍यासाठी काय योगदान आहे. हे जनता जाणते आहे. फक्‍त पोपटासारखे बोलता आले म्हणजे नेता होता येत नाही. प्रचार सभेत फक्‍त शिवराळ भाषेत वळसे पाटील यांच्यावर टीका करणे एवढेच त्यांना जमते. याउलट वळसे पाटील कमी बोलतात व कामे डोंगराएवढी करतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.