कांदा मागितल्याने तिघांस लोखंडी पाईपने बेदम मारहाण

पोलीस ठाण्यात 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल

नगर – तालुक्‍यातील बाबुर्डी बेंद फाट्याजवळील राजविर हॉटेल व लॉजिंगवर कांदा मागितल्या कारणावरून तिघास लोखंडी पाईप, खोऱ्याच्या दांड्याने जब्बर मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात 6 जणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी मनोज बाजीराव चोभे, लखन चोभे, दत्ता चोभे, बंडू सावळे (सर्व. रा. बाबुर्डी बेंद ता. नगर), अक्षय रोकडे रा. कोरेगाव ता. श्रीगोंदा) यांनसह दोन अनोळखींनी जखमी सुनिल फक्कड अडसरे (वय-24, रा.शेडाळा ता. आष्टी, जि.बीड), ऋषीकेश कांडेकर, वैभव संजय साठे (दोघे. रा. वाळकी, ता. नगर) यांना मंगळवारी लोखंडी पाईप, लाकडी दांडक्‍यांनी जबर मारहाण केली.

याबाबत माहिती अशी की, फिर्यादी अडसेरे हा मंगळवारी राजविर हॉटेलमध्ये जेवण करत असतांना कांदा का दिला नाही अशी विचारणा केली असता त्याचा राग येवून फिर्यादीस व त्याच्या मित्रास डोक्‍यात, तोंडावर जब्बर मारहाण करण्यात आली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात 6 जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.