इमीडा बॉटलच्या माध्यमातून महिलेची उत्तुंग भरारी

– रामचंद्र सोनवणे

राजगुरूनगर – खडतर परिस्थितीवर मात करीत राजगुरूनगर येथील सुनिता एकनाथ टोपे या महिलेने खादी ग्रामोउद्योगच्या माध्यमातून यशस्वी वाटचाल केली आहे. त्यांनी प्लॅस्टिक ब्लोमोल्डिंग मशीन खरेदी करून शेतीसाठी लागणाऱ्या औषधे साठविणाऱ्या इमीडा बॉटल उत्पादित करीत प्रगती केली आहे शिवाय चार महिला आणि घरातील त्यांच्या दोन मुलांना रोजगाराचे साधन साधन दिले आहे.

राजगुरुनगर येथे वाडा रस्त्यावर राहणाऱ्या सुनिता एकनाथ टोपे या महिलेने त्यांच्या घरी इमीडा बॉटल तयार कारानायचा छोटा उद्योग सुरु केला आहे. खेड आंबेगाव जुन्नर, शिरूर आणि मावळ या तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात शेतकरी शेती व्यवसाय करीत आहेत. शेतातील पिकांना विविध प्रकारची औषधे फवारली जातात. त्याचे नारायणगाव, मंचर आणि चाकण इंडस्ट्रीमध्ये छोटे-मोठे कारखाने आहेत. त्यांना लागणाऱ्या बॉटल पुरवणाऱ्या काही ठरविक लघू उद्योग या परिसरात आहेत.

मशीन देणाऱ्याने केली फसवणूक
मशीन तयार करणाऱ्या एका व्यक्‍तीच्या बॅंक खात्यावर 10 लाख रुपये वर्ग केले. मात्र, मुंबईमध्ये राहणाऱ्या या व्यक्तीने मशीन बनविली नाही. नंतरनंतर फोन घेण्याचे बंद केले. अखेर कारखाना असलेल्या मुंबई येथे गेले तेथे गेल्यावर यासंदर्भात कारखाना नसून एक छोटा गाळा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. शेजारील दुकानदाराच्या मदतीने त्या माणसाचा त्यांनी शोध लावला ते त्यांच्या घरी गेले. मशीन नाही व पैसे देण्याचे त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली यात मोठा कालावधी गेला. अखेर टोपे यांनी न्यायालयात खटला दाखल केला. न्यायालायचा निकाल टोपे यांच्या बाजूने लागला.

Leave A Reply

Your email address will not be published.