सभागृहातील गोंधळामुळे विरोधकांचा संताप वाढला

पुणे – स्थायी समितीच्या निवडीवरून सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होत नसल्यामुळे विरोधकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली. त्यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते. अखेर अध्यक्ष सभागृहात न आल्यामुळे विरोधकांनी उपस्थित सदस्यांमधील ज्येष्ठ सदस्य आशा बुचके यांची सभा अध्यक्ष म्हणून निवड केली.

यावेळी शिवसेना गटनेते देवीदास दरेकर यांनी सभेचे कामकाज करण्यास सांगून, पदाधिकारी पळून गेले असले तरी सभेचे कामकाज वैधानिकपणे करण्याचा अधिकार सभागृहाला असल्याचे सांगितले. तर भाजप गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसने त्यांच्यातील वाद मिटवावा, सभागृहाला वेठीस धरू नये, असे सांगून कामकाज सुरू केले. मात्र उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सभागृहात कोरम नसल्याचा मुद्दा उपस्थित करत कामकाज तहकूब केले. त्यानंतर अर्धा तासाने देखील पदाधिकारी सभागृहात आले नाहीत. त्यामुळे झाली एवढी शोभा पुरे, अशी भूमिका घेत सर्व सदस्यांनी सभा तहकूब केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील भांडणामुळे जिल्हा परिषदेचे बदनामी होत आहे. कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून निवडणूक प्रक्रिया न घेता पळून जाण्याची भूमिका घेतली. तर एका महिला युवती सदस्याचा अपमान करण्याचे कृत्य त्यांच्याकडून झाले आहे. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, अशी मागणी गटनेते देवीदास दरेकर यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)