बुरुडगाव रोड परिसरात जागा बळकावण्याचा प्रयत्न

नगर – बुरुडगाव रोड परिसरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सर्वसामान्य नागरिक, व्यापारी वर्ग यांच्यावर दहशत निर्माण करुन जागा बळकाविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या परिसरात भितीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.

या संदर्भात शहर विभागाचे पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके यांची शैलेश गांधी, कमलेश भंडारी, सुवेंद्र गांधी, निलेश पोखरणा, प्रमोद डागा, प्रदीप गांधी, सुरेश गुंदेचा, पिटू कटारिया, शिरीष ओझा, मनिषा लोढा, विजय गांधी, श्रेयेश पोखरणा, ईश्‍वर पोखरणा, संतोष लोढा, राजेश बोरा, नितीन शिंगवी यांच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.

यामध्ये बुरुडगावरोड परिसरातील मोकळ्या जागा, बंगले, गोडाऊन यावर विशिष्ट प्रकारच्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडून बेकायदेशीरपणे ताबा घेत दहशत केली जात आहे. जागा मालकांनी जर विरोध केला तर पोलिसात तक्रार करुन ऍट्रॉसिटी, विनयभंग, महिलांवर अत्याचार या सारखे खोटे पण गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केले जात आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.