टोकियो –भारताच्या पुरुष हॉकी संघाने तब्बल चार दशकांचा दुष्काळ संपवताना जर्मनीचा 5-4 असा पराभव करत ब्रॉंझपदक पटकावले. या सामन्यात अखेरच्या सहा सेकंदांत श्रीजेशने केलेल्या अफलातून बचावाच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला.
भारताचा गोलकीपर पी. श्रीजेश या सामन्याचा खरा हिरो ठरला. त्याने जर्मनीविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात चार गोल रोखले नसले तरीही त्याने अखेरच्या सहा सेकंदांत जर्मनीचे प्रयत्न अपयशी ठरवताना भक्कम बचाव दाखवला व सामना भारताच्या बाजूने झुकवला.
King only bows down to the bar that raised his standards high! 🙏#HaiTayyar #IndiaKaGame #Tokyo2020 #TeamIndia #TokyoTogether #StrongerTogether #HockeyInvites #WeAreTeamIndia #Hockey pic.twitter.com/3Xb6V1PEa1
— Hockey India (@TheHockeyIndia) August 5, 2021
हा सामना भारताने 5-4 असा जिंकला. मात्र, त्यात श्रीजेशचे योगदान सर्वांत मोठे आहे. या सामन्यात भारताने 4 चार गोल स्वीकारले. मात्र, त्यानंतर जर्मनीला एकही संधी मिळू दिली नाही. या कामगिरीसाठी श्रीजेशवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
श्रीजेशने अत्यंत महत्त्वाच्या क्षणी कोणतीही चूक न करता जर्मनीला बरोबरी करून देणारा गोल रोखल्याने भारताचे ब्रॉंझपदक निश्चित झाले. या विजयानंतर भारतीय संघातील सर्व खेळाडूंनी श्रीजेशला आनंदाने आलिंगन दिले.