मेष : नोकरीत रटाळ काम संपवण्याकडे तुमचा कल राहील. वरिष्ठ व सहकारी कामात मदत करतील.
वृषभ : घरात मोठयांच्या प्रकृतीची काळजी घ्या. सलोख्याचे संबंध राहतील याची काळजी महिलांनी घ्यावी.
मिथुन : कर्म केल्याशिवाय फळ मिळत नाही हे लक्षात येईल. फायदा मिळवण्याकडे कल राहील.
कर्क : नवीन कामाच्या संधी दृष्टिक्षेपात येतील. मात्र त्या स्विकारताना स्वतःची आर्थिक व शारिरीक कुवत ओळखून मगच पुढे जा. व्यवहारात चोख रहा.
सिंह : नोकरीत कोणावरही विसंबून राहू नका. अतिविश्वास ठेवू नका. नवीन कामाच्या संधी दृष्टीक्षेपात येतील.
कन्या : आळसाने कामे लांबवलीत तर पुढे दुप्पट कामे करावी लागतील. घरात प्रियजनांच्या भेटीचे योग येतील.
तूळ : महत्वाचे निणय घेताना महिलांना जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल. तरुणांना प्राविण्य दाखवता येईल.
वृश्चिक : कामात बदल करुन विस्तार करण्याचा विचार असेल आवश्यक वाटल्यास मध्यस्थांचा उपयोग होईल.
धनु : व्यवसायात आर्थिक आवक फार नसली तरी केलेल्या कामाचे समाधान मिळेल. चिडचिड वाढेल.
मकर : जुनी येणी वसुल करण्यावर भर राहील. खर्चासाठी तात्पुरता बचतीतील पैशाचा वापर करावा लागेल.
कुंभ : नोकरीत कामाचा ताण वाढेल. त्यामुळे दगदग धावपळ होईल. वरिष्ठ कामात सवलतीचे आश्वासन देतील.
मीन : घरात महत्वाचे निर्णयात तुमचा पुढाकार राहील. तरुणांना कर्तृत्व दाखवण्याची संधी मिळेल.