आजचे भविष्य (गुरुवार, 10 जून 2021)

मेष : व्यवसायात आवक जावक राहील. खर्चाचे गणित कोलमडेल तरी महत्वाच्या खर्चांना प्राधान्य द्या.

वृषभ : तात्पुरती पैशाची सोय होईल. नोकरीत हातून चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. अतिविश्‍वास टाळा.

मिथुन : कामातील बेत गुप्त ठेवा. घरात इतर व्यक्तिंच्या गरजा भागवूनही त्यांचे समाधान होईलच नाही.

कर्क : जुने आजार डोके वर काढण्याची शक्‍यता. मनन चिंतन करावे. सामूहिक क्षेत्रात झेपेल तेवढेच काम करावे.

सिंह : “”अंथरूण पाहून पाय पसरा” व्यवसायात यश मिळालेच पाहिजे हा अट्‌टहास धरू नका. डोक्‍यावर बर्फ ठेवा.

कन्या : व्यवहारी दृष्टीकोन ठेवून कृती करा. कोणतेही महत्वाचे निर्णय घाईने घेऊ नका. पैशाचा अपव्यय टाळावा.

तूळ : नोकरीत स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करू नये. वरिष्ठांच्या मर्जीत राहून कामे करावीत.

वृश्‍चिक : घरात स्वतःचा हट्‌टी स्वभाव नडेल. इतरांचे विचारही ऐकून घ्या. व मगच तुमचे मत मांडा.

धनू : वैचारिक मतभेद मन कलुषित करेल. सारासार विचारानेच कृती करा. महिलांनी तडजोडीचे धोरण स्वीकारावे.

मकर : “”रात्र थोडी सोंगे फार” अशी स्थिती तुमची असेल. घर व व्यवसाय दोन्हीकडे लक्ष दयावे लागेल.

कुंभ : कामामुळे दगदग धावपळ वाढेल. व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नवीन ध्येयधोरणे स्वीकाराल.

मीन : कामाची योग्य आखणी करून त्याप्रमाणे कृती कराल. नोकरीत वरिष्ठांच्या सल्लयानुसार काम करा.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.