मेष : व्यवसायात कष्टाचे चीज होईल. पैशांची चिंता मिटेल. मान व प्रतिष्ठा मिळेल.
वृषभ : कामाच्या वेळी काम करून इतर वेळी अराम कराल.
मिथुन : अपेक्षित लाभ होईल. व्यवसायात कामाचा ताण वाढेल.
कर्क : व्यवसायात नवीन जबाबदारी स्वीकाराल.
सिंह : व्यवसायात आपल्या ताकदीचा अंदाज घेऊन नीट पावले टाका.
कन्या : कार्यसिद्धी करण्यासाठी झपाटा राहील.
तूळ : व्यवसायात प्रगती करण्यासाठी ठोस पावले उचलाल.
वृश्चिक : हाती घेतलेल्या कामात यश मिळाल्याने आनंद द्विगुणित होईल.
धनु : मन चिंती ते वैरी न चिंती…या म्हणीची प्रचिती येईल.
मकर : स्वकष्टाने कामं पूर्ण कराल.
कुंभ : अंगी असलेले सुप्त कलागुण दाखवण्याची संधी मिळेल.
मीन : जशास तसे धोरण स्वीकारून वागावे.