मुंबई: आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित लता मंगेशकर यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या. शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला.
दरम्यान, लतादीदींच्या निधनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील शोक व्यक्त केले आहे. शरद पवार यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
शरद पवार यांचे ट्विट
”जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले. लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
जगभरातील कोट्यवधी संगीतप्रेमींच्या कानांना तृप्त करणारे अलौकिक स्वर आज हरपले.
लतादीदींच्या आवाजाच्या परीसस्पर्शाने अजरामर झालेल्या गीतांच्या माध्यमातून हा स्वर आता अनंतकाळ आपल्या मनांमध्ये गुंजन करत राहील.
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/U9Nhn1KrpE— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 6, 2022