मुंबई – आपल्या मंजुळ स्वरांची मोहिनी टाकत अख्ख्या जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका आणि भारतरत्न पुरस्काराने सन्मानित ‘लता मंगेशकर’ यांचे निधन झाले त्या 93 वर्षांच्या होत्या.
शेकडो हिंदी चित्रपट आणि सुमारे 36 देश विदेशी भाषांमध्ये आपला स्वरसाज उमटवला. त्यांच्या गाण्यांनी नेहमीच श्रोत्यांच्या कानांना मंत्रमुग्ध केले.
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबरला मध्यप्रदेशातील इंदोर मध्ये झाला आहे. त्यांच्या जादुई आवाजामुळे देशभरात त्यांचे लाखो चाहते निर्माण झाले आहेत.
वडिलांना संगीताची आवड असल्याने त्यांनी पहिल्यापासून संगिताची लता दीदींच्या मनात आवड निर्माण केली. त्यामुळे त्या इथंपर्यंत पोहचू शकल्या. दीदींनी त्यांच्या करिअरमधलं पहिलं गाण किती हसाल चित्रपटासाठी 1942 साली गायलं होतं.
दरम्यान, मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लता दीदींना न्युमोनियाची लागण झाली होती. तसंच त्यांचा करोना चाचणीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला होता. करोनातून त्या बऱ्या देखील झाल्या होत्या. पण न्युमोनियाची लागण झालेली असल्यानं त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.