आमदार अशोक पवार यांची ग्वाही : स्वयंरोजगार मेळाव्यास प्रतिसाद
शिरूर (प्रतिनिधी) – स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिरुर शहरात अभ्यासिका सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आमदार ऍड. अशोक पवार यांनी केले. शिरूर येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने राजमाता जिजाऊ मॉं साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्याच्या प्रतिमेचे पूजन, स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळावा व समाजातील गुणवंतांना समाज भूषण पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
पवार म्हणाले की, ग्रामीण भागात ही गुणवंत विद्यार्थी आहे. विविध क्षेत्रात हे विद्यार्थी यश मिळवित आहे. शिक्षण व कर्तृत्वाने व्यक्ती मोठ्या होतात. येथील मंगल कार्यालयाजवळ जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवसेवा मंदिर मंडळाच्या सभागृहात समाज बांधवाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अधिकारी किरण पोळेकर यांनी विविध योजनांची माहिती देवून स्वंयरोजगारांबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी माजी न्यायाधीश कान्हू भाऊसाहेब कटके, प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झालेले अक्षय पांडुरंग ताठे, तालुका कृषि अधिकारी प्रतिभा केतन गवारी, मोनाली अशोक बेंद्रे, नेमबाजी क्रिडा प्रकारातील राष्ट्रीय खेळाडू सुजाता तुकाराम डाळिंबकर, मयुरी ज्ञानेश्वर पाचंगे, साक्षी संजय वाघ, आदर्श सरपंच वर्षा फक्कड काळे, जिजाबाई दुर्गे, अरुण घावटे, अभिनेते वैभव बढे, हर्षल डोंगरे, गिर्यारोहक साहिल दत्तात्रेय बांदल यांना समाजभूषण पुरस्कार सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले. यावेळी ऍड. प्रदीप बारवकर, ऍड. किरण आंबेकर, संभाजी कर्डिले, प्रा. चंद्रकांत धापटे, रुपेश घाडगे, प्रा. विलास आंबेकर, माजी नगरसेवक रवींद्र धनक, रामभाऊ शेटे, संतोष शितोळे, नामदेवराव घावटे, योगेश महाजन, डॉ. नारायण सरोदे, रामभाऊ इंगळे, वैशाली गायकवाड, बापू सानप, महिबूब सय्यद, किरण बनकर उपस्थित होते.
माजी न्यायाधीश कटके, साक्षी डाळिंबकर, साहिल बांदल यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा. सतीश धुमाळ यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संजय बारवकर यांनी केले. किरण घावटे यांनी आभार मानले.