आरोपीने दिली पोलिसांच्या हातावर तुरी

नगर  – लघुशंकेची बतावणी करून आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार झाला. त्यामुळे एक प्रकारे कोतवाली पोलिसांच्या हातावर तुरी दिली असल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली. याबाबत कोतवाली पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.

सागर रामचंद्र धनापुरे (रा. तपोवन रोड) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे.गेल्या दोन तीन दिवसापूर्वी विनापरवाना गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना कोतवाली पोलिसांनी कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून 45 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मात्र, त्यातील एकाची प्रकृती खालावल्याने सागर यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी सागरने लघु शंकेची बतावणी करून, जिल्हा रुग्णालयातून पलायन केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.