नवी दिल्ली : एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी नेहमीच आपल्या स्पष्ट आणि वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत राहतात. यावेळी देखील त्यांनी एक वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला आहे. त्यांनी पोलिसांना धमकी दिल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
योगी आदित्यनाथ हे नेहमी मुख्यमंत्री राहणार नाहीत आणि नरेंद्र मोदी हे नेहमी पंतप्रधान राहणार नाहीत. पोलिसांकडून मुस्लिमांवर अत्याचार होत असून हा अन्याय आम्ही कधीही विसरणार नाही. आम्ही हा अन्याय लक्षात ठेवू. अल्लाह तुम्हाला त्याच्या शक्तीने नष्ट करेल. परिस्थिती बदलणार आहे. योगी पुन्हा मठात जातील आणि मोदी हिमालयात जातील, त्यावेळी तुम्हाला कोण वाचवणार?,’
अस ओवेसींच्या या भाषणावर विरोधकांनी टीका केली असून आता भाजप नेते संबित पात्रा यांनी एक वादग्रस्त ट्वीट केले आहे. संबित पात्रा यांनी मोदी-योगींची तुलना थेट शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांच्याशी केली आहे.
नेमकं काय म्हणाले संबित पात्रा
‘कुणाला धमकावत आहात मियां…? लक्षात ठेवा जेव्हा-जेव्हा या भूमीवर कुणी औरंगजेब किंवा बाबर येणार तेव्हा तेव्हा मातृभूमीसाठी कुणी शिवाजी, महाराणा प्रताप आणि मोदी-योगी उभे राहणार! ऐका, आम्ही न कधी मुघलांना घाबरलो न कधी जिन्ना वादियांशी घाबरलो. मग तुम्हाला काय खाक घाबरणार?’ असे ट्वीट संबित पात्रा यांनी केले आहे.