टीएमसी खासदार नुसरत जहां अडकली विवाहबंधनात

नवी दिल्ली – बंगाली सिनेसृष्टीची प्रसिद्ध अभिनेत्री आणि टीएमसीची नवनिर्वाचित खासदार नुसरत जहां विवाहबंधनात  अडकली आहे. कोलकत्याचे व्यावसायिक निखिल जैन यांच्याशी नुसरतने लगीनगाठ बांधली आहे. सूत्रानुसार,  १९ जून रोजी टर्कीच्या बोरडममध्ये या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. नुसरतने लग्नाचे फोटो इंस्टग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान, संसदेत पाश्चिमात्य कपडे परिधान केल्याने तृणमूल काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदार मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ सोशल मीडियावर चांगल्याच ट्रोल झाल्या होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.