करोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड वर्षापासून अनेक जण “वर्क फ्रॉम होम’ म्हणजे ऑफिसला न जाता ऑफिसचे काम घरीच करत आहेत. हा कालावधी खूपच दीर्घ असल्यामुळे कंटाळा येणे साहजिक आहे. कंटाळा आल्यावर त्याचा परिणाम तुमच्या कामावरही दिसून येतो. त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स खालावतो.
अशा परिस्थितीत स्वत:ला ताजेतवाने ठेवणे गरजेचे आहे. मात्र 24 तास घरातच बसून ताजेतवाने वाटणार नाही. अशा वेळी तुम्ही निसर्गाचा आधार घेऊ शकतात. कारण निर्सगात गेल्यावर तुमचा कंटाळा कुठल्या कुठे पळून जाईल. पण आता बाहेर फिरायलाही मनाई असल्यामुळे निसर्गात कसे जायचे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर तेही शक्य आहे. कसे ते पाहा…
सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्ही गॅलरीत थांबून उगवत्या सूर्याचे दर्शन घेऊ शकता. सकाळचे कोवळे किरण अंगावर पडल्यावर उत्साह येतो. घराच्या आजूबाजूला असलेल्या झाडांवर विविध पक्षी बागळत असतात. त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता. पक्ष्यांची गाणी ऐकणे म्हणजे एक पर्वणीच. कारण हे सर्वात श्रवणीय नैसर्गिक संगीत आहे.
यामुळे तुमचा दिवस आनंददायी होईल. संध्याकाळी पुन्हा तुम्ही गॅलरीत येऊन थांबला तर तुम्हाला मनोहारी सूर्यास्त बघायला मिळेल. पक्ष्यांची गाणी पुन्हा ऐकायला मिळेल. रात्र झाल्यावर टेरेसवर फिरायला जा. चांदरात्रीचा आनंद घ्या. लुकलुकणाऱ्या चांदण्या तुम्हाला नाचताना न दिसल्यास नवल!Tired of “work from home”