नैसर्गिक पोषणमूल्यांचा स्रोत ड्रॅगन फ्रूट

डायटरी फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने पचनशक्ती सुधारते

हल्ली बाजारात गुलाबी रंगाचं आणि त्याला फुटलेल्या पोपटी शेंडय़ांचं वांग्याप्रमाणे मोठं असलेलं फळ दिसतंय. त्याच्या या दिसण्यामुळेच त्याला ‘ड्रॅगन फ्रूट’ असं म्हटलं जातं. ‘पिटय़ा’ या नावानेही हे ओळखलं जातं. कम्बोडिया, थायलंड, तैवान, मलेशिया, व्हिएतनाम, श्रीलंका, फिलिपाइन्स, इंडोनेशिया, बांगलादेश आदी ठिकाणी या फळाचं पीक घेतलं जातं. चीनमध्येही थोडय़ाफार प्रमाणात या फळाचं पीक घेतलं जातं. हे फळ तीन प्रकारांत येतं. एक म्हणजे बाहेरून लाल आणि आतला गर पांढरा रंगाचा असतो.

दुसरा प्रकार म्हणजे बाहेरून आणि आतून हे फळ लाल रंगाचं असतं. म्हणजे याचा गरही लाल रंगाचाच असतो. या प्रकाराला ‘पिटय़ा रोजा’ असं म्हणतात. तिसरा प्रकार म्हणजे ‘पिटय़ा अम्रीला’ किंवा ‘यलो पिटय़ा’. या तिस-या प्रकारात पिवळ्या रंगाची साल असते आणि गर मात्र पांढ-या रंगाचा असतो. यात असलेल्या बियांपासूनच याची लागवड केली जाते. याचं झाड हे दिसायला निवडुंगाप्रमाणेच दिसतं. या फळाचे विविध उपयोग असून याची साल ही लिंबू किंवा संत्र्याच्या सालीप्रमाणे असते. चवीला गोड असणा-या फळाचे उपयोग पुढीलप्रमाणे –

  1. कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी असल्याने वजन नियंत्रित राखण्यास मदत होते. यात जीवनसत्त्व सीचं प्रमाण भरपूर असल्याने अँटिऑक्सिडंट म्हणून काम करते. त्यामुळे शरीराला नको असणारी रॅडिकल्स शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.

  2. कित्येकदा आपण फळातल्या बिया काढून टाकतो. पण यातल्या बिया आकाराने लहान असून त्या गरात एकवटल्या असल्याने त्या काढणं आपल्याला शक्य होत नाही. मात्र या बियांमध्ये फॅट्स कमी करण्याचा गुणधर्म असल्याने त्या पोटात गेल्याने फायदेशीरच आहेत. डायटरी फायबरचं प्रमाण भरपूर असल्याने पचनशक्ती सुधारते.

  3. हे फळ म्हणजे नैसर्गिक पोषणमूल्यांचा स्रेत आहे, कारण यात जीवनसत्त्व सी, बी१, बी२, बी३ आणि लोह, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचं प्रमाण अधिक आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते त्यामुळे मधुमेही रुग्णांनी या फळाचं आवर्जून सेवन करावं.

  4. याचा गर केसांच्या मुळाशी लावल्यास कंडिशनरचं कार्य करतो. त्याचप्रमाणे केसांच्या रंगाचं संरक्षण करतं. आथ्र्राटिसचा त्रास असलेल्या रुग्णांनीही या फळाचं नियमित सेवन केल्यास सांधेदुखीपासून त्यांना आराम मिळतो. याचा गर चेहरा किंवा काळवंडलेल्या त्वचेवर लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो. याचा गर काकडीचा रस आणि मधात घालून ते त्वचेला लावल्यास त्वचेला मॉइश्चर मिळतं आणि काळवंडलेली त्वचा पूर्ववत होण्यास मदत होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.