लंडन – आपले मुख्यालय लंडनमध्ये हलवण्याचा विचार “टिकटॉक’ या व्हिडिओ एन्टरटेनमेंट ऍपकडून केला जात आहे. त्यासाठी ब्रिटन सरकारबरोबर चर्चा सुरू असल्याचेही समजते आहे. चीनच्या मालकीपासून दूर राहण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.
त्यासाठी मुख्यालय चीनमधून बाहेर अन्य देशांमध्ये हलवण्यासाठी “टिकटॉक’कडून वेगवेगळ्या शहरांच्या पर्यायावर विचार केला जात आहे. या पर्यायांमध्ये लंडनचा पर्याय सर्वात आघाडीवर असल्याचे समजते आहे.
मात्र अन्य कोणत्या पर्यायांचा कंपनीकडून विचार केला जात आहे, हे समजू शकलेले नाही. मात्र कॅलिफोर्नियातील आपला विस्तार कंपनीने झपाट्याने करायला सुरुवात केली आहे. याशिवाय वॉल्ट डिस्नेचे माजी सह कार्यकारी अधिकारी केविन मयेट यांनाही कंपनीत समाविष्ट करून घेण्यात आले आहे.
“टिक टॉक’ कंपनीकडून ग्राहकांच्या डाटाचा गैरवापर केला जाऊ शकतो, या भीतीतून कंपनीच्या डाटाची वॉशिंग्टनमध्ये कसून तपासणी करायला सुरुवात केली आहे. “टिक टॉक’ या ऍपची मालकी चीनच्या बाईट डान्स या कंपनीकडे आहे.