नागपूरमध्ये मृतावस्थेत आढळला वाघ

नागपूर – नागपूर येथील रामटेक वनक्षेत्रात एक वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. मानेगाव बिट परिक्षेत्रातील बिहाडा खाणीत तो तरंगताना दिसला. या खाणीत पडून त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, राज्यात वर्षभरात आतापर्यत 18 वाघांचा मृत्यू झाला आहे.

रामटेक वन परिक्षेत्रातील मानेगाव बिट संरक्षित वनकक्षातील बिहाडी खाणीत वाघ मृतावस्थेत तरंगत असल्याचे वनसंरक्षक संदीप गिरी यांना माहिती मिळाली. यानंतर वन अधिका-यांनी घटनास्थळी भेट दिली. हा वाघ 55 फूट खोल असलेल्या खाणीत पडला होता. हा भाग खडकाळ असल्याने अंदाज न आल्याने तो खाणीत पडला असावा. तसेच खाणीत पाणी असल्याचे त्याचा मृत्यू झाला. याबाबत शवविच्छेदनानंतर अधिकृतपणे माहिती समजेल, असे वन अधिका-यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.