मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांची आज बोलावलेली मातोश्रीवरील बैठक अचानक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक दुपारी 12 वाजेच्या सुमारास पार पडणार होती. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शिवसेनेच्या सर्व खासदारांना सांगण्यात आले होते. परंतु, आज सकाळी अचानकपणे ही बैठक रद्द करण्यात आली आहे. ही बैठक नेहकी कशामुळे रद्द करण्यात आली, याची माहिती सेनेकडून देण्यात आली नाही.
संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एनडीएमधून बाहेर पडलेल्या शिवसेनेच्या खासदारांनी सभागृहात नेमके कशाप्रकारे कामकाज करायला हवे, संसदेमध्ये सादर होणाऱ्या वेगवेगळ्या विधेयकांबाबत नेमकी काय भूमिका असायला हवी, याची व्यूहरचना करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या खासदारांची आज मातोश्रीवर बैठक बोलावली होती.