नरसिंहपूर – राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते ‘देवेंद्र फडणवीस’ यांनी आज (दि. ८) त्यांचे कुलदैवत असलेल्या निरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नारायणाचे दर्शन घेतले.
दरम्यान, यावेळी फडणवीस यांनी गावातील दशरथ राऊत यांच्या हॉटेलमधील चहाचा आस्वाद घेतला. नरसिंहपूर येथील दशरथ राऊत या चहावाल्याशी असलेले फणवीस यांच्या ऋणानुबंधाची नेहमीच चर्चा होत असते.