नवी दिल्ली : देशभरात सध्या मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच लेहमध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरु झाला आहे. लेह आणि कारगील या भागांमध्ये सकाळपासूनच पावसाने हजेरी लावली. मात्र रात्री ९ नंतर लेहमध्ये पावसाचा जोर वाढला आहे. मुसळधार पावसाने जोर धरला. कारगील डीआयपीआरने ट्वीट करत लोकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
लेह आणि कारगीलमध्ये विजांच्या गडगडाटासह पाऊस आला आहे. वातावरण ढगाळ राहिल तसेच यामुळे भूस्खलन होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. लेहमध्ये रस्त्यांमध्ये अडसर येऊ शकतात. लोकांनी शांत आणि सतर्क रहावे आवाहन करण्यात आले आहे.
Last night’s heavy rainfall resulted in damage to Leh-Nubra Road at Khardong & Khalsar villages, and Tia Nallah, causing destruction to public properties. I’ve contacted authorities, urging swift action & teams deployment for assessment and restoration at the earliest. #LehFloods pic.twitter.com/tsYXcxYrzr
— Jamyang Tsering Namgyal (@jtnladakh) July 21, 2023
खरदोंग आणि खालसार या गावातला रस्ता पावसामुळे बंद झाला होता. तो आता सुरु करण्यात आला आहे. तसेच पावसामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. लडाखचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनीही ट्विट करुन सांगितले आहे.
लेह या ठिकाणी खानावळ हे मराठमोळं हॉटेल चालवणारे प्रशांत ननावरे यांनीही या घटनेचा व्हिडीओ ट्वीट केला आहे. तसंच लेहमध्ये ढगफुटी झाल्याचे म्हटले आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरूवात झाली. काहीतरी फुटल्याचा आवाज़ आला. त्यानंतर पाऊस थांबला. लेहच्या रस्त्यांवर पाणी आणि चिखल आहे.
दरम्यान लोकांनी घाबरुन जाऊ नये आणि सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे. लेहमधला पाऊस सध्या थांबला आहे. मात्र यामुळे रस्ते आणि इतर सार्वजनिक मालमत्ता यांचे नुकसान होत आहे.