मुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता नेता कुठल्या पक्षाशी हाथ मिळवणी करून शपथ विधी घेऊल याचा नेम नाही. गेल्यावर्षी एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड करतमुख्यमंत्री पदाची शपथविधी घेतली तर आता गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मात्र राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की,अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार आहे.
अशात आज अजित पवार यांचा आज म्हणजेच शनिवारी २२ जुलै रोजी वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. सध्या या ट्विटची सर्वत्र चर्चा होत आहे. अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे की,’मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व’ असं ट्विट करत मिटकरी यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओ अजित पवार यांचा भाषणाचे क्लिप असून त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या आहे.
मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की……! लवकरच #अजितपर्व pic.twitter.com/12jZ8BMPRi
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 21, 2023