राहुरी – अल्पवयीन शाळकरी मुलीचा तिघांनी पाठलाग करत तिचा विनयभंग केला. तसेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल करण्याचा प्रकार राहुरी शहरात उघडकीस आला आहे.
या घटनेतील 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही राहुरी शहरातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. ती शाळेत जात येत असताना शहरातील तीन तरुण आरोपी गेल्या सहा महिन्यांपासून तिचा पाठलाग करून तिला त्रास देत होते. तिचा विनयभंग करण्यात आला. तिचे अश्लील फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला ब्लॅकमेल केले. वेळोवेळी 74 हजार रुपये रोख रक्कम व एक सोन्याची चेन घेतली.
या आरोपींचा त्रास सहन न झाल्याने पीडीतेने फिर्याद दाखल केली. आरोपी आतिष राजेश खोडे (रा. बुरड गल्ली), विकी ऊर्फ आदित्य सुरेश गुप्ता,( रा. राजवाडा), रोहित देवानंद बिवाल, (रा. शनीचौक, राहुरी) या तीन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने आज पहाटे तीन वाजेच्या दरम्यान तीनही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन गजाआड केले. या घटनेचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक निरज बोकील हे करीत आहेत.