कोपरगाव – गवंडी काम करणाऱ्या एका मजुराने आपल्या मजुरीचे पैसे मागितल्याचा राग आला आणि चौघांनी मिळून गावातील भर चौकात खुन केल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव येथे घडली आहे.
येसगाव येथील गवंडी काम करणारा मजुर दिपक दादा गांगुर्डे हा गावातील एकाकडे गवंडी काम केलेल्या श्रमाचे पैसे मागण्यासाठी गेला.
गवंडी कामाची मजुरी मागितल्याच्या कारणातून झालेल्या वादात चौघांनी त्या मजुराला लाथा बुक्क्यांनी दगड आणि लाकडी दांड्याने मारहाण करुन हत्या केल्याची घटना सोमवारी संध्याकाळी तालुक्यातील येसगाव कमानीजवळ घडली. यामध्ये मजुर दिपक दादा गांगुर्डे वय ४० वर्ष याला गंभीर दुखापती होवून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. या घटनेची माहिती पोलिसांना कळवताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवुन गंभीर जखमी असलेल्या दिपक गांगुर्डे यास कोपरगाव ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी पाठवले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषीत केले.
दरम्यान पत्नी जया गांगुर्डे यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले की, दीपक दादा गांगुर्डे हे मजुरी ( गवंडी काम ) करीत असतात त्यांनी उषा सुनील पोळ, स्नेहा सुनील पोळ, बबलू सुनील पोळ, अनिल प्रमोद गायकवाड यांच्याकडे गवंडी काम केलेल्या कामाची मजुरीचे पैसे मागण्यांसाठी गेले असता त्यांन राग आला आणि चौघांनी शिवीगाळ करून लाकडी दांडके,लाथा बुक्क्याने दगडाने मारहाण केली शरीरावर ठीक ठिकाणी मारहाण करून जबर जखमी करून खून केला.