नवी दिल्ली – भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच एक मालगाडी केवळ महिलांच्या क्रूने चालवल्याची घटना समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या विभागात गुजरातमधील वडोदरा आणि महाराष्ट्रातील वसईरोड या दोन स्टेशनांदरम्यान ही मालगाडी तिघींनी मॅनेज केली. त्यामध्ये इंजिन ड्रायव्हरची भूमिका दोघींनी तर गार्डची भूमिका तिसऱ्या महिलेने बजावली.
प्रवासी रेल्वे महिलांनी चालवणे किंवा अशा रेल्वेमध्ये गार्डची भूमिका महिलांनी आजवर बजावली आहे. मात्र, केवळ मालगाडी एका स्टेशनमधून दुसऱ्या स्टेशनपर्यंत बिनधोकपणे नेणे वाटते तितके सोपे नसते. मात्र, या तीन महिलांनी हा अवघड टास्क व्यवस्थितपणे यशस्वी केल्याने त्या तिघींवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. कुमकुम डोंगरे, उदीता वर्मा आणि आकांक्षा रॉय अशी या तिघींची नावे आहेत.
महाराष्ट्र के वसई रोड से गुजरात के वडोदरा तक मालगाड़ी का कुशलता से संचालन कर हमारी महिला कर्मचारियों ने सशक्तिकरण का एक अद्भुत उदाहरण सामने रखा है।
इस ट्रेन में लोको पायलट से लेकर गार्ड तक की जिम्मेदारी महिला कर्मचारियों द्वारा संभाली गयी। pic.twitter.com/mEubyshNAe
— Piyush Goyal (@PiyushGoyal) January 7, 2021
या घटनेचे वृत्त समजताच रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी एका ट्वीटद्वारे या तिघींचे कौतुक केले असून, महिला सशक्तीकरनाचे हे एक आदर्श उदाहरण असल्याचे म्हटले आहे.