नवी दिल्ली – देशातील सर्वात मोठी बॅंक एसबीआयने आपल्या करोडो खातेदारांना मोठी खुशखबर दिली आहे. काही निवडक मुदत ठेवीवर (Fixed Deposit) व्याज दरात वाढ केली आहे. बॅंकेने एक ते दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी असलेल्या एफडीवर व्याजदरात 10 बेसिस प्वाइंटपर्यंत वाढ केली आहे. नवीन दर हे 8 जानेवारी 2021 पासून लागू झाले आहेत.
एसबीआयने सांगितले आहे की, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी असलेल्या किरकोळ एफडीवर 8 जानेवारीपासून हे दर लागू झाले आहेत. त्याआधी 10 सप्टेंबर रोजी व्याज दरात सुधारना करण्यात आली होती.
जाणून घ्या नवीन व्याज दर –
– 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 2.9 टक्के दराने व्याज मिळेल.
– 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 3.9 टक्के दराने व्याज मिळेल.
– 180 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.4 टक्के दराने व्याज मिळेल.
– 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.4 टक्के दराने व्याज मिळेल.
– 1 वर्षापासून 2वर्षाखालील एफडीवर 5 टक्के दराने व्याज मिळेल.
– 2 ते 3 वर्षाखालील एफडीवर 5.1 टक्के दराने व्याज मिळेल.
– 3 ते 5 वर्षांच्या एफडीमध्ये 5.3 टक्के दराने व्याज मिळेल.
– 5 वर्ष आणि 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 5.4 टक्के दराने व्याज मिळेल.
ज्येष्ठ नागरिकांना किती व्याज मिळेल?
ज्येष्ठ नागरिकांना सामान्य नागरिकांच्या तुलनेत 50 बेसिस पाॅइंट अधिक व्याज मिळते. बॅंकेने केलेल्या दुरूस्तीनुसरा ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्ष मुदतीच्या एफडीवर सुमारे 3.4 टक्के ते 6.2 टक्के व्याज मिळते.
– 7 दिवस ते 45 दिवसांच्या एफडीवर 3.4 टक्के दराने व्याज मिळेल.
– 46 दिवस ते 179 दिवसांच्या एफडीवर 4.4 टक्के दराने व्याज मिळेल.
– 180 दिवस ते 210 दिवसांच्या एफडीवर 4.9 टक्के दराने व्याज मिळेल.
– 211 दिवस ते एक वर्षापेक्षा कमी एफडीवर 4.9 टक्के दराने व्याज मिळेल.
– 1 वर्षापासून 2वर्षाखालील एफडीवर 5.5 टक्के दराने व्याज मिळेल.
– 2 ते 3 वर्षाखालील एफडीवर 5.6 टक्के दराने व्याज मिळेल.
– 3 ते 5 वर्षांच्या एफडीमध्ये 5.8 टक्के दराने व्याज मिळेल.
– 5 वर्ष आणि 10 वर्षापर्यंतच्या एफडीवर 6.2 टक्के दराने व्याज मिळेल.