पिंपरी (प्रतिनिधी) – इंडस्ट्रिअल स्पोर्ट्स असोसिएशन ट्रस्टच्या वतीने मोशीतील पुणे एक्झिबिशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या इंडस्ट्रिअल मॅरेथॉनमध्ये सुमारे तीन हजार नागरिक धावले.
यावेळी इंडस्ट्रियल मॅरेथाॅनमध्ये विजेत्या स्पर्धकांना आयोजक सुभाष जयसिंघानी,अंकाजी पाटील, रवी हिरेमठ,राहुल सप्रे,जगमोहन सिंग यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले.
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची निरोगी आरोग्यशैली जपण्याच्या उद्देशाने या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती सुभाष जयसिंघानी यांनी यावेळी दिली. ही स्पर्धा महिला आणि पुरुष २१ किमी, १०किमी आणि ५ किमी या गटात घेण्यात आली. २१ किमी ४५ वर्षावरील पुरूष गटात पांडूरंग पाटील, गौरव आणि संतू वारडे विजयी ठरले.
महिला गटात प्रसन्नप्रिया रेड्डी, डॉ पल्लवी मूग आणि अनिता पाटील विजयी ठरले. २१ किमी ४५ च्या वर्षावरील गटात( विदेशी) मुलू झेनेबे तर महिला गटात अकाले निगुसेआणि मागझे सोफा हे विजयी ठरले. २१ किमी ४५ वर्षांखालील गटात प्रल्हाद धनवट, राणी मुलचंद, निहाल बेग , रोहिणी पाटील , पीएच थिप्पेस्वामी, रितू,
सुंदर पोळ, संतोष वाघ, सुरेश चौगुले, निकिता गोविलकर, प्रतिभा नाडकर , प्रीती म्हस्के यांनी यश संपादन केले. ५ किमी ४५ वर्षे वरील गटात मुकेश मिस्त्री, वसंत देसाई , राम लिंभारे, अंबिका नंदा, नांसि पिंटो, निशा वाबळे,
५ किमी ४५ वर्षे खालील गटात धुळादेव घागरे, यशराज चाकूरे, गणेश आठवले , वैशाली सावंत, मानसी यादव, अदिती हरगुडे यांनी यश संपादन केले.