पिंपरी, (प्रतिनधी) – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन व पोलीस प्रशासनाकडून भोसरीतील अनेक बाबींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. सर्वसामान्यांना कायद्याचा दंडुका दाखविणारे पोलीस प्रशासन व महापालिका प्रशासन भोसरीत अनेक ठिकाणी नमलेले दिसते. राजकीय दबावापोटी ही परिस्थिती उद्भवली असल्याचे बोलले जात आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एक खेडेगाव ते कष्टकर्यांचे आश्रयस्थान अशी मजल भोसरीने गाठली आहे. मात्र इथपर्यंतच्या प्रवासात अनेक स्थित्यंतरे पाहिलेल्या भोसरीतील आजचे चित्र काहीसे अंतर्मुख करायला लावणारे आहे.भोसरी- आळंदी रस्त्यावरील गवळी उद्यानातील प्रार्थनास्थळांच्या अतिक्रमणांना राजकीय पाठबळ मिळत असल्याने दिघीकरांचे हक्काचे उद्यान धार्मिकस्थळांच्या गर्दीत हरविले आहे.
याबाबत महापापालिका प्रशासनाकडे दाद मागूनही आजतागायत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, हे वास्तव आहे. गेल्या चार दिवसांत शहराच्या विविध भागांतील अतिक्रमणांवर कारवाई करून शेखी मिरवणार्या अधिकार्यांना अतिक्रमणांनी व्यापलेले गवळी उद्यान सोयीस्करणे दिसत नाही. विशेष म्हणेज महापालिकेच्या कचरा संकलनासाठी ही जागा अपुरी पडत असतानादेखील महापालिका याकडे दुर्लक्षा करत आहे.
तर दुसरीकडे राजमाता जिजाऊ उड्डाणपुलासमोरील चांदणी चौकातील एका बार मालकाने पगारी माणसे नेमत, उड्डाणपुलाखालच्या जागेवर स्वत:च्या बारसाठी जागेवर पार्कींगसाठी कब्जा केला आहे. ही बाब महापालिका अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही कारवाई झालेली नाही.
लांडेवाडीतील पीएमपी बसथांब्यामागे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे उद्यान असल्याचे अनेकांच्या स्मरणात आहे. तसा फलकही या उद्यानचे अस्तित्व दाखवत आहे. मात्र, आता याठिकाणी झालेल्या प्रार्थनास्थळाच्या अतिक्रमणामुळे हे उद्यान केवळ कागदोपत्री शिल्लक राहिले आहे.
पिंपरी-चिंचवडचा लक्षमी रोड अशी ओळख असलेल्या भोसरी -आळंदी रस्त्यावरील बाजारपेठेमधून वाहन चालविणे चालकांसाठी दिव्य ठरत आहे. चोवीस तास वर्दळीच्या या रस्त्यावर ‘ वाहतूक शाखेचे ‘नो पार्कींग’ तसेच सम -विषम पार्कींग हे नियम लागू नाहीत. शहरातील अन्य बाजारपेठांमध्ये बशिस्त, नो पार्कींगमधील वाहनांवरील कारवाईचा भोसरी-आळंदी रस्त्यावर कायम अभाव दिसतो. त्यामुळे काय वाहतूक कोंडीचा नागरिक अनुभव घेत असतात.
लांडेवाडीतील राजमता जिजाऊ महाविद्यालयाजवळील खासगी टॅव्हल्सच्या अनेक बस दररोज रस्त्या व्यापूप टाकत आहेत. याकडे पाहण्यासाठी भोसरी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचार्यांना वेळ मिळत नाही. मात्र, भोसरी पोलीस स्टेशननजीक काही अंतराजवळीलचौकात चालकांना दिसणार नाही, असे थांबून हे कर्मचारी वाहतूक नियमनाऐवजी कारवाईवर भर देताना दिसतात.