पिंपरी, (प्रतिनिधी) – आकुर्डी येथील डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, डॉ. डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्चमध्ये अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीने सुरू केलेल्या संशोधन केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
पिंपरी चिंचवड विभागातील “सेंटर ऑफ एक्सलन्स” हे पहिलेच संशोधन केंद्र आहे. उदघाटन प्रसंगी अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीचे तांत्रिक सल्लागार डॉ. मनमोहन कालगल, क्षेत्रीय तांत्रिक विभाग प्रमुख अरविंद महाजन, विभागाचे रविशंकर सिंग, क्षेत्रीय तांत्रिक विभाग प्रमुख,
विशाल कुलकर्णी, योगेश कुलकर्णी , डी. वाय. पाटील इंटरनॅशनल विद्यापीठाचे कुलगुरू प्रा प्रभात रंजन, डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुल संचालक रिअर ऍडमिरल अमित विक्रम, उप कुलगुरू डॉ.संदीप चटर्जी, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ॲड रिसर्च च्या प्राचार्य डॉ.अनुपमा पाटील, स्थापत्य विभाग प्रमुख डॉ प्रविण गोरडे आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कालगल म्हणाले कि, अल्ट्रा टेक सेंटर ऑफ एक्सलन्स सहयोगी उपक्रम शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्र यांच्यातील दरी कमी करण्यासाठी बनविण्यात आला आहे. याद्वारे करिअरच्या विविध संधी आणि सिमेंट काँकि्रट विषयी माहिती दिली
कुलगुरू रंजन म्हणाले कि, भविष्यात या सेंटर अंतर्गत संशोधन केंद्र व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डीवायपाटील इंजिनिअरिंग कॉलेज आणि अल्ट्रा टेक सिमेंट दोन्ही संस्थांमध्ये सामंजस्य करार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा तेजश्री गुळवे यांनी तर आभार डॉ.अतुल कोल्हे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी स्थापत्य अभियांत्रिकीच्या सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. आयोजनाबद्दल डी. वाय. प्रतिष्ठानचे विश्वस्त तेजस एस. पाटील, संस्थेचे चेअरमन सतेज डी. पाटील संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले.