सोलापूर – राज्यातील अनेक जिह्ल्यात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्यातील काही भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होतांना दिसत आहे तर काही जिह्ल्यात दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाकडून नियम जारी करण्यात आले आहे. तरी सुद्धा अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याच्या घटना घडत आहे. सोलापूरमध्येही अशीच खळबळजनक घटना समोर आली आहे.
मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे करण म्हेत्रे यांचे शनिवारी करोनाने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर रविवारी त्यांच्या अंत्ययात्रेला जवळपास हजारोंची गर्दी जमली होती. या गर्दीमुळं सोलापुरात करोनाचा विस्फोट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकणात पुढे धक्कादायकबाब समोर आली ती म्हणजे या हॉस्पिटलला कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास परवानगी नव्हती. तरीही या हॉस्पिटलमध्ये करण म्हत्रे यांच्यावर उपचार करण्यात आले होते. आता या प्रकरणात डॉक्टरांसह 250 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
या प्रकणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. प्रमुख 20 जणांसह एकूण 200 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. भादवि कलम 353, 188, 268, 269, 270 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. यात कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास करगुळेसह कॉंग्रेस नगरसेविकेचे पती जॉन फुलारी यांचा सहभाग आहे. तर मृत करण म्हेत्रे यांचा भाऊ बुग्गपा म्हेत्रे हा प्रमुख आरोपी आहे. तसंच डॉ.विद्याधर सूर्यवंशी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.