नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. सैन्य दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा आणि अवंतपोरा या दोन ठिकाणी जोरदार चकमक झाली. यावेळी अवंतीपोरा भागात तीन दहशतवाद्याचा खात्मा झाला असून दोन्ही ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये लष्कर ए तोयबाचा कमांडर मुख्तार भट याचा समावेश आहे. सुत्रांच्या मते तो एफटी सोबत जवानांच्या शिबिरावर हल्ला करण्यासाठी जात होता. पोलिसांनी या चकमकीनंतर एक एके-74 रायफल, एक एके-56, एक पिस्तुल आदी शस्त्रसाठा हस्तगत केला आहे.
या अगोदर सोमवारी कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरच्या जुमागुंड भागात जवानांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याचा खात्मा केला होता. पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्यासाठी कुरापती सुरूच आहेत.