मुंबई – बॉलिवूडचा किंग खान आज आपला ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखच्या मन्नत या मुंबईतील घराबाहेर चाहत्यांनी प्रचंड गर्दी करत आपल्या लाडक्या स्टारला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभिनयाचे कोणतेही बॅग्राऊंड नसताना शाहरुख खानने आपल्या अनोख्या स्टाइलच्या जोरावर अनेक सुपरहिट सिनेमे दिले. जन्म दिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना एका पॉर्न स्टारने देखील शाहरुखला शुभेच्छा दिल्या आहेत.
अमेरिकन पॉर्नस्टार किंद्रा लस्टने आपल्या सोशल मीडियावर शाहरुखसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये किंद्राने थेट शाहरुखच्या पठाण या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. तसेच किंद्राने यावेळी happy birthday king srk असे कॅप्शन देखील दिले आहे. किंद्रा ही हॉलिवूडसह अडल्ट इंडस्ट्रीमध्ये पॉर्नस्टार म्हणून प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने शुभेच्छा देत थेट शाहरुखला टॅग देखील केले आहे.
View this post on Instagram
नेटकऱ्यांनी या पोस्टवर जोरदार कमेंटबाजी केली आहे. काहींनी याला शाहरुखची हवा असा म्हंटल आहे. तर काहींनी आता शाहरुखने या स्टारला रिप्ले देण्याची मागणी केली आहे. तर अनेकांनी पठाण चित्रपटात तू देखील झळकणार का ? असा सवाल विचारला आहे.