श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक सीआरपीएफ जवान शहीद झाला आहे. जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात तीन दहशतवादीही ठार झाले आहे. घटनास्थळावरून दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.
#UPDATE J&K: One injured terrorist has been apprehended by security forces, in Parim Pora, Srinagar. Arms & ammunition recovered. https://t.co/K2RSQSxGlE
— ANI (@ANI) February 5, 2020
यापूर्वी 31 जानेवारी रोजी सुरक्षा दलांनी जैश-ए-मुहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हे दहशतवादी मोठ्या गुन्ह्याच्या उद्देशाने जम्मूमधील एका ट्रकमध्ये लपून बसले होते. या चकमकीत एक पोलिस कर्मचारी आणि दोन सीआरपीएफ जवान जखमी झाले होते.