मनमाड – मनमाड रेल्वे स्थानकात टोळक्याने मिळून एकाची धारदार शस्त्राने वार करत हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ऐन भाऊबीजेच्या दिवशीच एकुलत्या एक भावाची हत्या करण्यात आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रेल्वे स्थानकावर नंदीग्राम एक्स्प्रेस उभी असताना हा खून करण्यात आला आहे.
शिवम पवार असे खून करण्यात आलेल्या युवकाचे नाव असून शिवम यास तीन बहिणी आहेत. हा खून प्रेमपकरणातून करण्यात आला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. खूनाच्या वेळी मुलगी देखील घटनास्थळी होती. खून केल्यानंतर मारेकरी नंदीग्राम एक्स्प्रेसने मुंबईकडे फरार झाले आहेत.
या घटनेनंतर शिवमला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याच्या शरिरावरील घाव खोल असल्यामुळे रुग्णालयात जाण्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे. संबधित मुलिला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले असून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. पुढिल तपास पोलिस करत आहेत.