मुंबई – अभिनेत्री आणि राजकारणी ‘नुसरत जहॉं’ ही खासगी आयुष्यातील गोष्टींमुळे सतत चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच नुसरतने मुलाला जन्म दिला. यीशान असे मुलाचे नाव असून मुलाच्या जन्मावरून देखील नुसरतला ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर आता नुसरतने अभिनेता यश दासगुप्ता याच्याशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
आनंदाचा, उत्साहाचा सण म्हणून दिवाळी ओळखली जाते. नुसरत जहाँ यांनी सोशल मीडियावर दिवाळीचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पहिल्यांदाच नुसरत यांनी बाळासोबतचा सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
यामध्ये फोटोमध्ये नुसरत यांच्या बरोबर अभिनेता यश दासगुप्ता सुद्धा दिसून येत आहे. नुसरत जहाँ यांच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. निखिल जैनपासून विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत.