सातारा (प्रतिनिधी): जिल्ह्यातील एका करोनाबाधितासह तिघांचा शुक्रवारी रात्री उशिरा म्रुत्यू झाला. म्रुत्यू झालेल्या इतर दोघांचे स्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. कराडच्या कृष्णा मेडीकल कॉलेजमध्ये विंग येथील करोनाबाधित तसेच किडनीचा आजार असलेल्या ५० वर्षीय पुरुष रुग्णाचा रात्री दि. २९ मे रोजी मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
कराड तालुक्यातील पाठरवाडी येथील ३३ वर्षीय पुरुष व सातारा शहरातील बुधवार पेठेतील ६५ वर्षीय पुरुष अशा दोघांचा काल दि. 29 मे रोजी मृत्यु झाला आहे. करोना संशयित म्हणून या दोघांच्या घशातील स्त्रावांचा नमुने पुणे येथे तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत , अशी माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
१६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह
पुण्यातील एन.सी.सी.एस. यांनी १३२ जणांचे अहवाल व कराडच्या कृष्णा मेडीकल कॉलेजने ३५ जणांचे अहवाल असे एकूण १६७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
४३ जण विलगीकरण कक्षात दाखल
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात ४३ जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस. येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.