पुणे विद्यापीठांतर्गत आता तीन तासांची व्यायामसक्‍ती : कुलगुरू डॉ. करमळकर

पुणे – आरोग्य हीच खरी संपदा आहे. परंतु आज मुलांना व्यायाम करा हे सांगावे लागते, ही दुर्दैवाची बाब आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असून विद्यार्थ्यांसाठी तीन तासांचा व्यायाम सक्तीचा करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर म्हणाले. पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. अरुण दातार आणि डॉ. आरती दातार लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, खेळाडूंच्या अभ्यासक्रमात वेट ट्रेनिंगचे धडे देखील आवश्‍यक आहेत, अशी अपेक्षा डॉ. दातार यांनी व्यक्त केली. याबाबत कुलगुरूंनी या विषयाचा समावेश पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात निश्‍चितपणे केला जाईल. विद्यापीठाला स्वायत्तता असल्याने हे नक्की होईल, अशी घोषणा केली. स्पर्धकाची शक्ती, सहनशक्ती, लवचिकता, आणि त्याचबरोबर बौद्धिक क्षमता ओळखणाऱ्या “ट्रायनआर्ट’ या क्रीडा प्रकाराला सरकार दरबारी मान्यता मिळावी, असे आवाहन विक्रम गोखले यांनी केले. आपल्या संरक्षणाची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे त्यांच्या पोटाची अवस्था पाहता महाराष्ट्राच्या पोलीस खात्यातील पोलीसांच्या व्यायामाचे प्रशिक्षक म्हणून डॉ. अरुण दातार यांच्यासारख्या लोकांची निवड झाली, तर त्यांचे आरोग्य नक्कीच सुधारेल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विनया देसाई यांनी सूत्रसंचालन केले, डॉ. आरती दातार यांनी प्रास्ताविक केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.