दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांना धमकी

नवी दिल्ली – दिल्ली भाजप अध्यक्ष मनोज तिवारी यांना नुकतीच ठार मारण्याची धमकी दिली गेली आहे. त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे ही धमकी दिली गेली आहे. जर आवश्‍यकता भासली तर पंतप्रधानांनाही ठार मारले जाईल, असे या धमकीच्या संदेशामध्ये म्हटले आहे.

तिवारी यांनी या धमकीच्या संदेशाबाबत पोलिसांना कळवले आहे. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्‍तीने हिंदीमध्ये पाठवलेल्या या संदेशामध्ये “अत्यंत नाईलाजाने तुम्हाला ठार करण्याचा निर्णय घेतला आहे.’ असे म्हटले आहे. या धमकीबाबत लवकरच अधिकृतपणे तक्रार नोंदवली जाईल, असे दिल्ली भाजपच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख नीलकंठ बक्षी यांनी म्हटले आहे. शुक्रवारी दुपारी 12.52 वाजता तिवारी यांच्या मोबाईलवर हा धमकीचा संदेश आला. पण तिवारी यांनी तो संध्याकाळी बघितला. त्यानंतर त्याबाबत पोलिसांना कळवण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.