नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी रजनीकांत यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली होती. या भेटी दरम्यान, रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना वाकून नमस्कार केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर काही लोकांनी रजनीकांत यांना चांगलेच ट्रोल केले होते. दरम्यान, या ट्रोलिंगला राजीनीकांत यांनी उत्तर दिले आहे. एका मुलाखतीमध्ये रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना वाकून नमस्कार का केला याचे स्पष्टीकरण दिले आहे.
अभिनेते रजनीकांत हे तीन दिवसांच्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची लखनऊ येथे भेट घेतली. भेटीवेळी रजनीकांत यांनी योगी आदित्यनाथ यांना नमस्कार केला. याबाबत नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रजनीकांत यांना विचारण्यात आले. ते म्हणाले, ‘माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी योगी किंवा संन्याशांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची माझी सवय आहे. त्यामुळे मी तेच केले आहे.’
#WATCH | Actor Rajinikanth meets Uttar Pradesh CM Yogi Adityanath at his residence in Lucknow pic.twitter.com/KOWEyBxHVO
— ANI (@ANI) August 19, 2023
रजनीकांत यांनी अखिलेश यादव यांची देखील भेट घेतली तसेच उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी ‘जेलर’ हा चित्रपट लखनऊमधील एका थिएटरमध्ये पाहिला.रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट 10 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला.
‘जेलर’ या चित्रपटातील रजनीकांत यांच्या अभिनयाचं अनेकजण कौतुक करत आहेत. या चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबतच मोहनलाल, जॅकी श्रॉफ, रम्या कृष्णन, तमन्ना भाटिया, विनायकन आणि योगी बाबू या कलाकरांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. नेल्सन दिलीप कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.