ब्रिटनहून दिल्लीत आलेल्यांची होणार तपासणी

नवी दिल्ली – अलिकडच्या काळात ब्रिटनहून दिल्लीत आलेल्या नागरीकांची त्यांच्या घरी जाऊन वैद्यकीय तपासणी करण्याचा निर्णय दिल्ली सरकारने घेतला आहे. तसेच यापुढे ब्रिटनहून येणाऱ्या सर्वच नागरीकांची कोविड टेस्ट करण्याचा निर्णयही केजरीवाल सरकारने घेतला आहे.

आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की ब्रिटन मध्ये करोनाचा नवीन विषाणु सापडल्याने जी परिस्थिती उद्भवली आहे त्यावर आमच्या सरकारचे बारकाईने लक्ष आहे. ते म्हणाले की दिल्लीतील करोना नियंत्रणासाठी आम्ही मोठा लढा दिला आहे.

त्यात आम्हाला जे यश आले आहे ते आम्ही वाया जाऊ देणार नाही. गेल्या दोन आठवड्यात ब्रिटनहून सहा ते सात हजार नागरीक दिल्लीला आले आहेत. त्यातील अनेक नागरीक पंजाब आणि अन्य राज्यांत गेले आहेत.

त्या संबंधीत राज्यांनीही या नागरीकांची तपासणी करून नवीन करोना विषाणू फैलावणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे असे जैन यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.