नियम मोडणाऱ्यांना पुरंदरमध्ये घडवली अद्दल

93 ग्रामपंचायती हद्दींमध्ये 58 हजारांचा दंड वसूल

केतकावळे -पुरंदर तालुक्‍यात आठ दिवसांत 93 ग्रामपंचायती व 111 गावांतील सरपंच, पंचायत समिती समिती सदस्य, ग्रामसेवक, तलाठी व पोलीसपाटील यांच्यामार्फत एकूण 58 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांना अद्दल घडवली आहे.

तालुक्‍यात करोनाचा संसर्ग वाढत असताना मास्क न लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व इतर नियमांचे पालन न करणाऱ्यांकडून प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. ही कारवाई ग्रामपंचायतीच्या सामान्य पावती बुक नमुना नंबर 7 मधून वसूल करून ग्रामपंचायत फंडात जमा केली जाते आहे.

रुग्ण वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेऊन मास्क लावणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे व स्वतःची काळजी घेणे तसेच बाहेरील गावांची व्यक्‍ती गावांमध्ये राहायला आल्याबरोबर 14 दिवस क्‍वारंटाइन करणे आवश्‍यक आहे. तसेच गावातून बाहेर ये-जा करणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवून त्यांनाही दक्षता घेण्याबाबत सूचना करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.