जुन्नरमधील पाच गावांत बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

...तर लवकरच ही गावे करोनामुक्‍त होतील

ओझर -ओझर, हिवरे बुद्रुक, तेजेवाडी, धालेवाडी तर्फे हवेली व शिरोली बुद्रुक या गावांत करोनाचे रुग्ण आढळल्याने ही गावे तहसीलदारांनी कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहे. तर करोनाची साखळी तोडण्यासाठी या गावातील सर्व आस्थापने, दुकाने व व्यापार काही दिवस बंद ठेवण्याचे आवाहन केले होते, त्यास ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बुधवारी (दि. 15) सर्व व्यवहार बंद ठेवले होते.

या गावांतील रस्त्यांवर बुधवारी शुकशुकाट होता. ग्रामस्थांनी शासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन केले तर येत्या काही दिवसांत करोनाची साखळी तुटून येथील जीवन पूर्वपदावर येण्यास वेळ लागणार नाही, अशी आशा येथील कडकडीत बंद पाहिल्यावर झाली आहे. लोक मास्क वापरताना तसेच अत्यावश्‍यक असेल तरच घरातून बाहेर पडताना दिसत आहे, पण त्याचप्रमाणे फारच कमी आहे. येथील ग्रामस्थांनी स्वयंशिस्त पाळली तर लवकरच ही गावे करोनामुक्‍त होतील हे नक्‍की!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.