मुंबई – राज्यात कोरोनाचे प्रमाण अद्यापही कमी झालेले नाही. कोरोनामुळे सर्व सण, उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेनेचा दसरा मेळावा कसा होणार याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात होणार आहे. पहिल्यांदाच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतिर्थावर होणार नाही आहे. काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा मेळावा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसंच वाहिन्यांच्या माध्यमातून मेळावा देशभरात पोहोचणार आहे. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने याबद्दल वृत्त दिले आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. या दसरा मेळाव्याचे महत्व राजकीय आणि सांस्कृतीक देखील आहे. त्यामुळे दसरा मेळावा कसा घ्यायचा याबाबत काही दिवसांपासून नियोजन सुरु होते.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते कि, कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळून कार्यक्रम पार पाडता येईल, अशा पद्धतीनं नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार. असं राऊत म्हणाले.