“हा बलात्काराएवढाच मोठा गुन्हा’ प्रियांका गांधींचा फोटो पाहून मराठी अभिनेत्री भडकली

मुंबई – कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्याशी असभ्य वर्तन केल्याबद्दल मराठमोळी अभिनेत्री “हेमांगी कवी’ हिने संताप व्यक्त केला आहे. तिने सोशल मीडियावर प्रियांका गांधी यांचा फोटो शेअर करत हा बलात्काराएवढाच मोठा गुन्हा असल्याचं हेमांगी कवीने म्हटलं आहे.

आपल्या पोस्ट मध्ये हेमांगी म्हणाली, “आहे का सुरक्षित! कसे वाटतायेत ते हात तिच्यावर? हा ही बलात्काराएव्हढाच मोठा गुन्हा आहे! मूळ समस्या कुठेय कळतंय का? असं म्हणत हेमांगी कवीने संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, अमानुष अत्याचारांना सामोऱ्या जाणाऱ्या पीडितेनं या जगाचा निरोप घेतला. पण, तिला आणि तिच्या कुटुंबीयांना मिळणारी वागणुक पाहून अनेकांना संताप अनावर झाला.

प्रियांका गांधी या शनिवारी हाथरसमधील कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी जात होत्या. त्यावेळी त्यांच्या सोबत जाण्यासाठी कॉंग्रेसचे शेकडो कार्यकर्ते जमा झाले होते. त्यांच्यावर लाठीमार सुरू केला. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी अनेक पोलिस बदडत असलेल्या कार्यकर्त्याच्या मदतीसाठी बॅरिकेड्‌सवरून उडी टाकून धावल्या. त्यांनी पोलिसांना रोखल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यावेळी काही पोलिसांनी त्यांच्याशी असभ्य वर्तन केले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.