Weather Update| मागील तीन ते चार दिवसांपासून विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे अनेक भागात पिकांचे नुकसान झाले आहे. आजही राज्याच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
आज काही ठिकाणी रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे. एकीकडे काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. तर काही ठिकाणी तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. अनेक भागात कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे.
काही भागात ऑरेंज तर काही भागात यलो अलर्ट Weather Update|
यातच आज पुन्हा विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सध्या राज्यात पावसाला अनुकूल हवामान असल्याने आज विदर्भातील वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वारे, गारपिटीचा इशाऱ्यासह ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाडा, नगर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
तर अकोला, वाशिम आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. यासोबतच या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचाही इशारा हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, परभणी, बीड, लातूर, नांदेड, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाने हजेरी लावली होती.
मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली आहे. त्याचा परिणाम शहरासह संपुर्ण जिल्ह्याच्या वातावरणावर झाला. त्यानुसार, मुंबई वगळता राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये ढगाळ हवामानाचे सावट असून विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची देखील शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा:
अमेठी-रायबरेलीतून कोण निवडणूक लढवणार? ए के अँटोनी यांनी दिले हे ‘संकेत’