मुंबई – बॉलीवूडच्या ‘वेलकम’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटात अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर आणि अनिल कपूर आणि परेश रावेल यांच्या दमदार अभिनयाने सिनेमाला चारचाँद लावले. वेलकम चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर या चित्रपटाचा ‘वेलकम बॅक’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर मागील काही दिवसांपासून वेलकम 3 चित्रपटाची चर्चा रंगली आहे. त्यानंतर आता चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या चित्रपटात अक्षय कुमार, संजय दत्त आणि अर्शद वारसी दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आणखी एक सुपरहिट अभिनेता या चित्रपटात सामील होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सुनील शेट्टीची एन्ट्री होणार आहे. ‘वेलकम 3’मध्ये सुनील शेट्टी दमदार आणि महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. ‘वेलकम 3’मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यावर त्याने लगेच होकार दिला. याबाबत सुनील शेट्टी देखील चांगलाच उत्सुक आहे. या चित्रपटात यापूर्वी कधीही न पाहिलेली भूमिका तो साकारणार असल्याचे म्हंटले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेलकम 3’चे प्री-प्रॉडक्शन काम सुरू झाले आहे. टीमने या चित्रपटाचे शूटिंग लोकेशनही फायनल केले असून लवकरच शूटिंग सुरू होणार आहे. टीम सध्या अॅक्शन सीन आणि कॅरेक्टरच्या लूकवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. ‘वेलकम’च्या तिसऱ्या भागाला आधी ‘वेलकम टू द जंगल’ असे म्हटले जात होते, पण आता या चित्रपटाचे नाव ‘वेलकम 3’ असणार आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती फिरोज नाडियादवाला करणार आहे.